April 17, 2021
healthy-lifestyle-tips

५ उपाय ज्याने तुमची पचनशक्ती सुधारून तुम्ही राहाल उत्साही आणि अॅक्टीव

चनशक्ती चांगली असणे आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे लक्षण आहे. परंतु सध्या अनिवार्य असणारी अनियमित जीवनशैली, जंकफूड, जागरण, अपुरी झोप यांमुळे पचनाच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. गॅस, करपट ढेकर, अपचन, पोट साफ न होण, भूक मंदावणे या तक्रारी जाणवतात.

mr.beingmarathi.in

या सगळ्यांमुळे शरीरात जडपणा येऊन संपूर्ण दिवस निरुत्साही वाटू शकत. यासाठी पचनक्रिया सुधारुन दिवसभर उत्साही राहण्याचे सोपे उपाय जे तुम्ही अगदी सहज घरच्या घरी करू शकता आणि कोणत्याही साईड इफेक्टविना. ते आम्ही सांगू तुम्हाला.

mr.beingmarathi.in

५ सोल्यूशन किंवा उपाय:

mr.beingmarathi.in
  • लिंबू – रोज सकाळी चहा पिण्यापूर्वी कोमट पाण्यात चतकोर लिंबू पिळून प्या.लिंबामुळे पोटातील तसेच युरिनरी इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
  • ओवा – पोटात दुखत असल्यास ओवा खायची पद्धत जुनी आहे. हाच ओवा तुम्हाला दोन्ही वेळच्या जेवणानंतर चिमूटभर खायचा आहे. ओव्याने पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. तुम्हाला मुखवास आवडत असल्यास त्यात प्रत्येकवेळी चिमूटभर ओवा मिसळून घ्या.
  • काळे मीठ – काळे मीठ पचनासाठी उत्तम मानले जाते. दुपारच्या जेवणात वाटीभर ताकात अर्धा चमचा काळे मीठ म्हणजेच सैंधव मिसळून ताक प्या. ताक पिणं शक्य नसल्यास सॅलेडवर किंवा फ्रूट डायटवर असल्यास त्यावर मीठ भुरभरवा.
  • पुदीना पचनावर रामबाण उपाय म्हणून पुदीना ओळखला जातो. पुदीना चटणी, सरबत किंवा पुदीन्याची पाने निवडून, सावलीत सुकवावी नंतर त्याची पूड करून पाण्यात घालून प्यावी. त्यातच लिंबू रस घातल्यास रिफ्रेशिंग डायट ड्रिंक तयार होईल.
  • आल्याचे पाचक आल, लिंबू, काळ मीठ तसेच पांढर मीठ घालून केलेल पाचक रोज रात्री जेवणानंतर एक चमचा घेतल्यास सकाळी तुमचा कोठा साफ होण्यास मदत होते.फास्ट लाईफ, टार्गेट, स्पर्धा हे बदलत्या जीवनशैलीत स्वरूप आहे.अशा जगण्यात आरोग्याचे सोपे नियम पाळल्यास तुम्ही नक्कीच फिट अॅण्ड फाईन राहू शकता.

Leave a Reply

Loading...
Loading...