March 5, 2021
पिंपल आणि ऑईल फ्रि ग्लोयींग स्कीन तीही घरच्या घरी

हे उपाय करा आणि मिळवा पिंपल आणि ऑईल फ्रि ग्लोयींग स्कीन तीही घरच्या घरी

उजळ आणि तजेलदार चेहरा सगळ्या तरुणाईला आकर्षित करतो. स्वताचा चेहरा सुंदर दिसावा यासाठी तरुणाई अग्रेसर असते. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बाजारात वेगवेगळी क्रीम्स, फेसवॅाश, मास्क उपलब्ध आहेत. या सौंदर्य प्रसाधानांच्या किंमती महाग आहेत तरीदेखील जाहिरातींमुळे महाविद्यालयीन तरुणाई या उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसते.

mr.beingmarathi.in

स्त्री वर्गाबरोबरच पुरुषही त्यांच्यासाठी असणारी विशेष प्रसाधन खरेदी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या आयुर्वेदात सुंदर त्वचेसाठी काही उपाय दिलेले आहेत. घरच्या घरी करता येणारे हे उपाय तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य नक्कीच वाढवू शकतात. चला बघूया अगदी सोपे असे हे मास्क+स्क्रब.

mr.beingmarathi.in
  • बेसन पिठाचा फेसपॅक १ चमचा बेसन पीठ + पाव चमचा हळद + ७ चमचे दूध एकत्र कालवा आणि चेहऱ्यावर लावा. डोळ्यावर काकडीचे किंवा बटाट्याचे पातळ काप ठेवा. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळ जाण्यास फायदा होतो. साधारण २०मिनिटांनी चेहरा धुवा. हळद रंग उजळ्यासाठी तसेच पिंपल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते तर बेसनमुळे चेहरा उजळतो तसेच बेसन पीठ त्वचेसाठी उत्तम स्क्रबर म्हणून काम करते. स्क्रबरने चेहऱ्यावरील मृत त्वचा जाऊन चेहरा तजेलदार होतो.
  • मुलतानी मातीचा फेसपॅक मुलतानी माती कोणत्याही सौंदर्य प्रसाधानाच्या दुकानात सहज उपलब्ध होते. १ चमचा मुलानी माती + ५ चमचे दूध एकत्र कालवून चेहऱ्याला लावा. पॅक लावल्यावर बोलू नका, चेहर्‍यावर मार्कस् येऊ शकतात. २०मिनीटांनी चेहरा धुवा. मुलतानी मातीमुळे चेहरा ऑईल फ्रि, उजळ, नितळ व सतेज होतो.
  • फ्रूट फेसपॅक त्वचेवरील काळे डाग जाण्यासाठी फ्रूट पॅक उपयुक्त ठरतात. पिकून काळे झालेले केळे आपण बरेचदा फेकून देतो, पण हेच केळे चेहर्‍यावर कुस्करून लावल्यास चेहर्‍यावरचे काळे डाग जाण्यास मदत होते. संत्र्याचा रस क्लींजींग म्हणून उत्तम काम करतो. संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पावडर केल्यास ते एक उत्तम स्क्रबर आहे. अशी १ चमचा पावडर + ४ चमचे दूध एकत्र करुन चेहऱ्यावर लावा व २०मिनीटांनी चेहरा धुवा.
  • चंदन फेसपॅक चंदन अतिशय शीतलता देते. अर्धा चमचा चंदन पावडर + ४ चमचे दूध एकत्र करून चेहर्‍याला लावा. २०मिनिटांनी चेहरा धुवा चंदनामुळे स्किन सॉफ्ट होण्यास मदत होते. तसेच चेहरा उजळतो. नक्की ट्राय करा हे ४ इझी फेसपॅक.

Leave a Reply

Loading...
Loading...