April 17, 2021

हळदीचे दुध करतील अनेक समस्या दूर

दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळदी ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे अनेक दुहेरी होतात. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. हळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो.

mr.beingmarathi.in

हळदीचे दूध हिवाळ्यात रोज प्यायल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. ह्ळदीपासून आपल्या शरीराकरता कोणते इतर देखील फायदे असणार आहे ते आपण पाहणार आहोत.

mr.beingmarathi.in

1.हळदीचे दूध रोगाणूविरोधी आहे आणि हे बॅक्टेरियल संक्रमण आणि वायरल संक्रमणशी लढते. हे दूध तुमच्या शरीरातील तापमान वाढवते आणि फुफ्फुसांमधील रक्तसंचय आणि sinus मधून लवकर आराम देते. म्हणून हे श्वसननलिकेसंबंधी आजरांवर उपचारासाठी उपयोगी ठरते. हळदीचे दूध अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस च्या इलाजासाठी देखील खूप उपयोगी आहे.

mr.beingmarathi.in

2.हळदी मध्ये अँटिसेप्टिक आणि सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. जे संक्रमणासोबत सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांशी लढण्यास मदत करतात.हे सुख्या खोकल्याविरुद्ध विशेष प्रभावशील आहे.

mr.beingmarathi.in

3.रक्तभिसरण क्रिया सुधारते :ह्या शक्तिशाली मसाल्याचा पूर्वीपासूनच आयुर्वेदातील औषधात एक रक्तशोधकाच्या रूपात उपयोग केला जातो. हे रक्ताभिसरण प्रक्रियेत सुधार करते. हे तुमच्या लिव्हर द्वारा पूर्ण शरीराचे डिटॉक्सीफाय करण्यास सुद्धा मदत करते.

mr.beingmarathi.in

4.शरीराचा कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. अशा वेळेस रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्याने फायदा होतो.

mr.beingmarathi.in

5.दूध प्यायल्याने त्वचेत एक चमक निर्माण होते. दुधासोबत हळदी सेवन केल्याने त्वचेच्या विकारापासूनही बचाव होतो. खाज, इंफेक्शन या सारख्या गोष्टींपासून संरक्षण होते.

mr.beingmarathi.in

6.आयुर्वेदानुसार हळदीचे दूध प्यायल्यास रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते तसेच हळदीतील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकामुळे विषारी घटक बाहेर पडण्याची प्रक्रिया सुधारते.

mr.beingmarathi.in

7.हळदीचे गरम दूध झोपण्याच्या एक तास अगोदर प्यायल्याने चांगली झोप लागते. दुधामध्ये सेरोटोनिन आणि मेलॅटोनीन असतात जे मस्तिष्क (मेंदू) रसायनं आहेत जे तुमच्या झोपेच्या क्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावतात. हळद तणाव कमी करते आणि तुमच्या शरीराला आराम देते.

mr.beingmarathi.in

8.नियमित हळदी सोबत दुधाचा एक ग्लास प्यायल्याने मासिक पाळीचा त्रास आणि अंतर्मन (Twitch) पासून अराम मिळतो.

mr.beingmarathi.in

9.हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील सांधे बळकट होतात. तसेच वेदना कमी झाल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते.

mr.beingmarathi.in

हळदीचे दूध रोगाणूविरोधी आहे आणि हे बॅक्टेरियल संक्रमण आणि वायरल संक्रमणशी लढते. हे दूध तुमच्या शरीरातील तापमान वाढवते आणि फुफ्फुसांमधील रक्तसंचय आणि sinus मधून लवकर आराम देते. म्हणून हे श्वसननलिकेसंबंधी आजरांवर उपचारासाठी उपयोगी ठरते. हळदीचे दूध अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस च्या इलाजासाठी देखील खूप उपयोगी आहे.

mr.beingmarathi.in

11.हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.

mr.beingmarathi.in

12.आयुर्वेदात हळदीला महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.

mr.beingmarathi.in

13.कच्च्या हळद पासून बनवलेले दूध स्तन, त्वचा, फुफ्फुस, prostate आणि पोटाच्या कॅन्सर ला रोखण्याचे काम करते. तसेच ह्यात सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. हे डीएनए ला नुकसान पोहोचणाऱ्या कॅन्सर पेशींना रोखतात आणि किमोथेरपीच्या साईड इफेक्ट ला कमी करतात.

mr.beingmarathi.in

14.हळद युक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. अल्सर आणि कोलाइटिस बरे करण्यास मदत करते. अल्सर, डायरिया आणि अपचन समस्या दूर होतात.

mr.beingmarathi.in

15.हळदीच्या दूधामध्ये अ‍ॅन्टीवायरल गुणधर्म असल्याने शरीरातील जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रतिबंध होतो. तसेच शरीरातीची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्याने यकृतावर होणारा जंतूंचा आघात कमी होतो.

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...