April 17, 2021

शीघ्रपतनाची समस्या का उद्भवते? जाणून घ्या त्याची कारणं आणि उपाय

शीघ्रपतनाची समस्या का उद्भवते? जाणून घ्या त्याची कारणं आणि उपाय

आपल्याकडे सार्वजनिकरित्या लैंगिकतेविषयी उघडपणे बोलणं टाळलं जातं. त्यामुळे लैंगिकतेविषयीच्या अनेक शंका, प्रश्न यांचे योग्य मार्गदर्शन न भेटल्यामुळे लैंगिक जीवन सुरळीत होण्यास अडचणी निर्माण होतात. पुरुषांना सतावणारा यापैकीच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे शीघ्रपतन होय. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण शीघ्रपतन का होते? याच्या काही कारणांचा मागोवा घेणार आहोत.

mr.beingmarathi.in

सर्वप्रथम शीघ्रपतन म्हणजे काय ते जाणून घेऊयात. शारीरिक संबंध ठेवताना वेळेच्या आधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे याला ढोबळमानाने शीघ्रपतन म्हणता येईल. फोरप्ले किंवा प्रणयक्रीडा झाल्यावर आणि नुकताच संभोग सुरु केल्यावर लगेच वीर्यस्खलन झाल्यामुळे संभोगाचा आनंद मिळत नाही. याचा परिणाम दोघांच्याही लैंगिक सुखावर होतो. शीघ्रपतनाची काही कारणं खालीलप्रमाणे सांगता येतील.

mr.beingmarathi.in

1) लग्नापूर्वी किंवा लग्नानंतरही शारीरिक संबंधांविषयी असलेली भीती किंवा चिंता, लैंगिक संबंधांविषयी आवड नसणे किंवा उत्सुकता नसणे, जोडीदारासोबत संभोग करताना प्रेम किंवा आकर्षण नसल्यास शीघ्रपतन होऊ शकतं.

mr.beingmarathi.in

2) शरीरातील टेस्टोस्टेरोन संप्रेरक त्याचप्रमाणे न्यूरोट्रांसमीटरससारख्या पेशींद्वारे निर्माण झालेल्या काही रसायनांमुळेदेखील शीघ्रपतनासारखी समस्या उद्भवू शकते. मूत्रमार्गावर आलेली सूज तसेच इतरही काही आजारांमुळे शीघ्रपतन होउ शकते. 

mr.beingmarathi.in

3) पुरुषाच्या लिंगात ताठरता येण्यास उशीर लागत असेल किंवा आलेली ताठरता जास्त वेळ टिकत नसेल तर शीघ्रपतन होऊ शकते. संभोगादरम्यान लिंग ताठ न झाल्यास मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळेदेखील शीघ्रपतन होऊ शकते.

mr.beingmarathi.in

4) मानसिक ताणतणाव, चिंता, भीती इत्यादी गोष्टींचा प्रभाव लैंगिक जीवनावर पडत असतो. अशा गोष्टींमुळे संभोगावर एकाग्रचित्तेने लक्ष देणे किंवा त्याचे सुख घेणे शक्य होत नाही आणि नकळतपणे शीघ्रपतन अर्थात वीर्यस्खलन होते.

mr.beingmarathi.in

उपाय काय? : सामान्यतः लग्न झाल्यानंतर लगेच शीघ्रपतनाच्या समस्या जाणवत असेल तर अशी समस्या पुढे चालून संभोगाची सवय झाल्यामुळे आपोआप दूर होण्याची शक्यता असते. मात्र ही समस्या नेहमीचीच त्रासदायक ठरत असेल तर वैद्यकीय तपासणी करून त्यावर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या जोडीदारालाही विश्वासात घेऊन याविषयी माहिती दिल्यास नात्यात गैरसमज अथवा दुरावा येण्याची शक्यता राहत नाही.

mr.beingmarathi.in

(Disclaimer : ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या वरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती हि प्राथमिक स्वरूपाची असून ती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय होऊ शकत नाही. यातील कोणताही उपचार किंवा सल्ला अमलात आणण्यापूर्वी सदरील विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याविषयी बीइंग महाराष्ट्रीयन पोर्टल कोणताही दावा करत नसून कसलीही जबाबदारी घेत नाही)

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...