April 17, 2021
विमान

विमान आकाशात बंद पडल तर?

काही काळापूर्वी सामान्यांसाठी स्वप्नवत असणारा विमान प्रवास देशांतर्गत विमान सेवेमुळे शक्य होऊ लागला आहे. विमान सेवेमुळे लोकांचा वेळ तर वाचतोच पण आरामदायी प्रवास ही होतो. उच्च वर्गात कमालीच लोकप्रिय असणार परदेशी पर्यटन मध्यम वर्गातही रूजू लागलय पण बरेच जणांना विमान प्रवासाची धास्ती वाटते. विमानतल इंधन संपल तर? इंजिन बंद पडल तर? अशी भीतीही वाटते. तर चला आज आपण तुमची ही भीती पण दूर करूयात.

mr.beingmarathi.in

सर्वसाधारणपणे विमान अपघाताचे प्रमाण कमी आहे.परिणामी विमान प्रवास सुरक्षित मानला जातो.विमानात जे इंधन वापरल जात ते केरोसीन(jetA-1), नाप्ता केरोसिन blend(jet B) या प्रकारच असते. विमान उडवण्यापूर्वी विमानाच इंधन तपासल जात तसेच नेमलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणाऱ्या इंधनापेक्षा जास्त इंधन विमानात भरल जात.

mr.beingmarathi.in

विमानतल इंधन आकाशात असताना कधीच संपत नाही, तसेच कमीही पडत नाही. इंधनाप्रमाणाच विमान इंजिनची उड्डाणापूर्वी तपासणी केली जाते तसेच वैमानिक या दोन्ही घटकांवर सातत्याने लक्ष ठेवून असतो. विमानाची अंतर्गत यंत्रणा कंट्रोल रूमशी सतत संपर्कात असते.

mr.beingmarathi.in

तसेच विमानाची रचना ग्लायडरप्रमाणेच केलेली असते परिणामी काही काळ विमान आकाशात विना इंजिन, इंधन उडू शकते. विमान अपघात कमी प्रमाणात होतात. लाखो किमी. चा प्रवास विमानामुळे काही तासात शक्य होतो. काही कारणास्तव विमानात बिघाड झाल्यास खाजगी छोट्या विमानात पॅराशूटची सोय असते तर मोठ विमान मोकळ्या मैदानात किंवा नदी तलावात उतरवता येत.

mr.beingmarathi.in

देशातंर्गत प्रवासात मुंबई ते शिर्डी विमानसेवा विशेष लोकप्रिय आहे. पहिल्यांदा विमानात बसताना जी धास्ती वाटते ती दूर झाली असेलच, मग आता लॉकडाऊन संपल्यावर सर्व सुरळीत झाल्यावर या हवाई सफरीचा आनंद निर्धास्तपणे घ्या…

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...