April 17, 2021
विमानाला का देतात पाणी उडवून मानाचा मुजरा?

विमानाला का देतात पाणी उडवून मानाचा मुजरा?

सैन्याने दिलेला सॅल्यूट तुम्ही नेहमीच पाहात असाल. या सॅल्यूटमधील शिस्त, रुबाब याने अभिमान वाटतो. कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात प्रोत्साहनपर मानाचा सॅल्यूट देऊन केली जाते. तुम्ही चित्रपटात नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून प्रोत्साहनपर मानाचा मुजरा केलेला पाहिला असेल. पण तुम्हाला माहित आहे विमानालाही अशा प्रकारे मानाचा मुजरा दिला जातो.

mr.beingmarathi.in

कशाप्रकारे देतात विमानाला मानाचा मुजरा?

विमानाला मानाचा मुजरा देण्यासाठी विमान विमानतळावर असताना फायर ब्रिगेडच्या पाईपने त्याच्यावर फोर्सने पाण्याचा फवारा सोडला जातो. या प्रकारची प्रथा सर्व एअरलाईन्स कंपन्या पाळतात. विमानाला या प्रकारे मुजरा देण्याची पद्धत पाण्यातील जहाजांवरून घेण्यात आली आहे. विमान स्वच्छ करणे किंवा थंड करणे हा या प्रथेचा हेतू नसून कोणत्याही नवीन विमानाचे स्वागत करण्याची ती पद्धत आहे.

mr.beingmarathi.in

कधी देतात विमानाला मानाचा मुजरा?

कोणत्याही विमान कंपनीच्या विमान ताफ्यातील एखादे विमान पहिल्यांदाच एखाद्या विमानतळावरून प्रथमच उड्डाण करत असेल तर त्याला असा मुजरा केला जातो. तसेच एखाद्या विमान कंपनीने नवीन एअर रूट सुरू केला व त्या रूटवरून पहिल्या दिवशी जे विमान ठरलेल्या विमानतळावर पोहोचते अशा विमानाला मुजरा द्यायची पद्धत आहे. उदा.मुंबई ते दिल्ली असा नवीन रूट असल्यास प्रथम दिवशी कंपनीचे जे विमान सर्वप्रथम दिल्लीत पोहोचेल त्याला मुजरा दिला जातो.

mr.beingmarathi.in

तसेच विमानाचा कॅप्टन निवृत्त झाल्यावरही त्याला मान देण्यासाठी अशाप्रकारे त्याने प्रवास केलेल्या विमानाला पाण्याची फवारणी करून मुजरा दिला जातो. तुमच्या मनात कुतूहलाने आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील तर नक्की विचारा.

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...