जगात अनेक लोक कमी वयात खुप मोठी पदे भुषवता . त्यामध्ये अनेकांनचा उल्लेख करावा लागेल . त्यातच जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान हा सना मरीन यांना मिळाला आहे . त्या वयाच्या ३४ साव्या वर्षी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे . त्या फिनलँडमधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या आहेत .
त्यांनी या आधी फिनलँडमध्ये परिवहन मंत्री म्हणुन काम केले आहे . त्यांनी याआधी अनेक महत्वाची पदे भुषवली आहेत . त्यांची वयाच्या 27 व्या वर्षी महापौरपदी निवड झाली होती .
फिनलँडमधील पंतप्रधान एंटी रिने यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान पदासाठी सना मरीन यांची पक्षांनी निवड केली. फिनलँडमध्ये मागील काही महिन्यापासून पोस्टाचा संप सुरू होता . पण या संपावर तोडगा काढण्यास ते अपयशी ठरले त्यामुळे एंटी रिने यांचा सहयोगी पक्षाने पाठिंबा काढून घेतला , व त्यामुळे त्यांना त्यांचे पद गमवावे लागले .
त्याच आता त्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान पदी विराजमान झाल्या आहेत .त्यांच्या नंतर दुसरा नंबर हा युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होन्चारूक यांचा लागला आहे . त्यांचे वय ३५ वर्ष आहे. जगभरातून शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव हा सध्या सना मरीन यांच्यावर होत आहे . त्यामुळे आता सर्वत्र सना मरीन यांची चर्चा होत आहे .