April 17, 2021

निरोगी राहायचे आहे तर रोज थोडं तरी मनुके नक्की खा

आयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आम्हाला रोज 4-5 मनुका खायलाच पाहिजे. मनुकांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात उत्तम औषध मानले जाते. चला तर आपण जाणून घेऊया मनुका खायचे फायदे नेमकी काय आहेत ते :-

mr.beingmarathi.in

१) बद्धकोष्ठता दूर होते – मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी खूप फायदा होतो. यासाठी पाण्यात भिजवलेले मनुके खावे. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, पित्त आणि थकवा येण्याची समस्या असेल तर मनुके खाणे खूप फायदेशीर ठरते. नियमितपणे मनुके खाल्ल्याने तुम्हाला खूप लवकर फायदा दिसून येईल.

mr.beingmarathi.in

२) रक्ताचे प्रमाण वाढते – मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी असते. त्यामुळे मनुके खाल्ल्यामुळे तुमच्या शरिरात रक्ताचे प्रमाण वाढते.

mr.beingmarathi.in

३) मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो.

mr.beingmarathi.in

४) झोपण्याच्या एक तास आधी उकळेल्या दुधामधून मनुक्यांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते. खास करुन बद्धकोष्टावर हा उपाय करुन पाहिल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते.

mr.beingmarathi.in

५) मनुक्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

mr.beingmarathi.in

६) दिवसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.

mr.beingmarathi.in

७) मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.

mr.beingmarathi.in

८) मूठभर मनुका खाऊन त्यावर पाणी प्यायल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम मनुका करतं.अशक्तपणा, अ‍ॅनिमियासारख्या आजारांवर मनुका गुणकारी आहेत.वजन वाढवण्यासाठी रोजच्या आहारात मूठभर मनुक्यांचा समावेश करावा. मनुकांमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...