April 17, 2021

धावाल तर निरोगी आरोग्य जगाल

खरे तर थंडीतच व्यायाम सुरू करावेत असे काही नाही. व्यायाम केव्हाही केला तरी त्याचे फायदे तेवढेच होतात. पण थंडीत घाम कमी येतो, हवा सुसह्य़ असते म्हणून या दिवसांत व्यायाम सुरू करणे बरे वाटते. व्यायामांनी शरीराची व स्नायूंची क्षमता वाढते, ‘स्टॅमिना’ सुधारतो, शरीराला प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. जॉ‌गिंग हा तुमच्यासाठी एक उत्तम व्यायामप्रकार आहे. पण तो मात्र नियमीतपणे करायला हवा. धावणे हा सर्वोत्तम आणि अति प्राचीन असा व्यायाम प्रकार आहे. बऱ्याच जणांना जिममध्ये जाऊन व्यायाम करणं आवडत नाही. मोठ्या आवाजातलं संगीत, इतरांच्या गप्पागोष्टी, मशिन्सचा आवाज अशा वातावरणात व्यायाम करण्याऐवजी मोकळ्या वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करणं बऱ्याच जणांना आवडतं. त्यांच्यासाठी जॉगिंग हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

mr.beingmarathi.in

*जे उत्तम धावपटू असतात त्यांचे फक्त पायच मजबूत नसतात, तर हृदय,फुफुसे आणि आतील सर्व इंद्रियेही सदृढ असतात. रोज निव्वळ सात मिनिटे धावण्याने (रनिंग) हृदयविकार व पक्षाघाताने मृत्यूची शक्यता ५५ टक्क्य़ांनी कमी होते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. वैज्ञानिकांच्या मते रोज केवळ सात मिनिटे हळूहळू धावण्याने आरोग्यास फायदा होतो. जे लोक धावण्याचा व्यायाम करीत नाहीत त्यांच्या तुलनेत तो व्यायाम करणाऱ्यांना हृदयविकार व पक्षाघातने मृत्यू येण्याची शक्यता कमी होते.

mr.beingmarathi.in

धावताना शरीरातील प्रत्येक अवयवाचा व्यायाम होत असतो. ज्या व्यक्ती शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी धावत असतील त्यांनी अधिक वेळ धावावे. दररोज दीड तास धावल्यास अतिरिक्त चरबी कमी करणे शक्य आहे. या व्यायाम प्रकारात सातत्य असणे आवश्यक आहे.

mr.beingmarathi.in

*धावताना हृदयाचे ठोके वाढतात. याचा अर्थ हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो आणि साहजिक हृदयाकडून इतर अवयवांना पोहोचले जाणारे रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. हृदयाचे ठोके – नियमित धावल्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात. त्यामुळे हृदय दीर्घकाळ आणि अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते. मात्र यासाठी धावण्यात नियमितता असावी.

mr.beingmarathi.in

कोलेस्टेरॉल घटवण्यासाठीही जॉगिंगचा फायदा होतो. जॉगिंगमुळे हृदय फिट राहायलाही मदत होते. हल्ली आपली लाइफस्टाइल पाहाता सर्व आघाड्यांवर लढण्यासाठी भरपूर स्टॅमिना गरजेचा असतो. जॉगिंगमुळे हा स्टॅमिनाही वाढायला सुरुवात होते.

mr.beingmarathi.in

*नियमित धावल्यामुळे मानसिक तणाव दूर राहू शकतात. मनःस्थिती चांगली राहते. माणूस दिवसभर ताजातवाना राहतो. मानसिक थकवा जाणवत नाही. धावल्यामुळे सर्वांगाला व्यायाम मिळत असल्यामुळे झोपही चांगली लागते. मानसिक स्वास्थ्यासाठी झोप अतिशय उपयुक्त असते.

mr.beingmarathi.in

धावताना अशी काळजी घ्यावी :-

शक्यतो सकाळी अगदी लवकर जॉगिंगसाठी बाहेर पडा. म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही. सकाळी शक्य नसेल, तर संध्याकाळी सहानंतरही जॉगिंगचा आनंद घेता येईल शक्य असल्यास जास्त झाडं असलेला परिसर किंवा रस्ता जॉगिंगसाठी निवडा.

mr.beingmarathi.in

जॉगिंगला जाताना घाम शोषून घेणारे, सैल, सुती कपडे वापरा. फॅन्सी कपड्यांचा मोह टाळा. आजकाल बाजारात जॉगिंगसाठी खास कपडे तसंच बूट मिळतात. त्यातून चांगल्या दर्जाचे, तुमच्या पायाला फिट बसणारे बूट निवडा. नाहीतर पायाला दुखापत होण्याची शक्यता असते.

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...