April 17, 2021
Sonu sood

गर्दीत उभ्या कॉलेज मित्रान हाक मारल्यावर काय केल सोनू सूदन

सोनू सूद सध्या परप्रांतीय प्रवाशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनोची साथ आणि त्या अनुषंगाने केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आपल्या गाव, घरापासून दूर मोठ्या शहरात अडकून पडले आहेत. या लोकांच्या मदतीसाठी सोनू सूदने पुढाकार घेत त्यांच्या प्रवासाची तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. अशा प्रकारे मदत करणारा तो पहिला अ‍ॅक्टर ठरला आहे.

mr.beingmarathi.in

या मोहिमेसाठी त्याने वेगवेगळ्या राज्य सरकाराची परवानगी घेत या मजुरांना घरी पोहोचवण्याचे काम तडीस नेले आहे. त्याच्या या कामाची दखल घेत अनेकांनी ट्विटरवर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे, तसेच काहीजणांनी आभार मानले आहेत.
https://twitter.com/fnhindustani/status/1266091275494682625?s=20
https://twitter.com/chintandesai/status/1265918296290820096?s=20

mr.beingmarathi.in

https://twitter.com/SonuSood/status/1265919232950202374?s=20
सोनूनेही या सर्वांना मनमोकळा प्रतिसाद दिला आहे. सोशल मिडीयावर सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.
या सगळ्यात सोनूची इच्छा सांगणारी एक पोस्ट समोर येत असून मोहन नावाच्या या व्यक्तीच्या पोस्टमध्ये २०१५ च्या एका घटनेचा उल्लेख आहे.

mr.beingmarathi.in

२०१५ साली सोनू एका इवेंटसाठी झांसीला जाणार होता. ठरलेल्या हॉटेलमध्ये सर्व संबंधित आणि मिडीया प्रतिनिधी त्याची वाट पाहत होते. यातच एक साधारण कपडे घातलेला संजयही उभा होता. या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपण सोनू सूदचा बॅचमेट असल्याचे सांगितले. त्याने सांगितले, सोनू पंजाब निवासी असून इंजिनियरिंगसाठी तो नागपुरात आला होता. तिथे ते दोघे रूममेट होते. दोघांची मैत्री झाली. काही कारणाने दोघांचे भांडण झाले आणि दोघे रूममेट राहिले नाहीत.

mr.beingmarathi.in

संजयने हेही सांगितले की, सोनुने ओळख दाखवली तर ठीक नाहीतर तो परत निघून जाईल. हे सांगताना तो थोडासा साशंक होता. काहीवेळान सोनूची कार हॉटेलात शिरली आणि संजय सगळ्यांबरोबर कारजवळ गेला. संजयन अडखळत सोनूला हाक मारली गर्दीतल्या मित्राच्या चेहर्‍याकडे लक्ष जाताच क्षणात त्याला ओळख दाखवत सोनूने त्याला हाक मारली आणि धावत जाऊन सगळ्यांसमोर संजयला कडकडून मिठी मारली. दोघेही जुन्या आठवणीत रमले. याच प्रसंगी मिडीयाने सोनूला त्याचा ड्रिम रोल विचारला असता आपल्याला ‘सुपर हिरोच’ काम करायची इच्छा असल्याच त्यान नमूद केल.

mr.beingmarathi.in

सोनू प्रत्यक्ष आयुष्यात सध्या असच काहीस काम करत आहे. काही दिवसापूर्वी त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारची परवानगी घेऊन काही कामगारांच्या भोजनाची तसेच गावी परतण्याची व्यवस्था केली. सोनूच्या पुढाकाराने ठाण्यातून गुलबर्गासाठी दहा बस रवाना झाल्या. तसेच काही बस वडाळ्याहून हरदोई, प्रतापगड, सिद्धार्थ नगर या ठिकाणी रवाना झाल्या. तसेच उत्तर प्रदेशातील विविध भागातील मजुरांना घेऊन बस रवाना झाल्या. सोनूने या सर्व प्रक्रियेत स्वता लक्ष घालत या प्रवाशांची भोजन व पाणी व्यवस्था केली.

mr.beingmarathi.in

सोनू सूदने यापूर्वी पंजाब डॉक्टरांसाठी १५०० पीपीई किट्स डोनेट केले आहेत. तसेच रमजान सणासाठी भिवंडीतील मजुरांची भोजन व्यवस्था केली होती. खरच रिल लाईफ हिरो सोनू सध्या रियल लाईफ हिरो ठरत आहे.

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...