April 17, 2021
farmerN95Mask

कोरोना पासून वाचवणाऱ्या N95mask चा जनक आहे एका शेतकर्‍याचा मुलगा

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सोशल डीस्टेसन्सींग, हात धुणे,गर्दी टाळणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मास्क वापरणे हे नियम म्हणजेच जीवनशैली बनवणे आवश्यक आहे. सध्या बाजारात विविध मास्क उपलब्ध आहेत, परंतु डॉक्टर, परिचारक आणि सामान्य लोकांची मागणी N95mask ला अधिक आहे.
या मास्कला अनेक देशांच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी मान्यता दिली आहे.

mr.beingmarathi.in

कोण आहे N95 mask चा जनक
तैवानमध्ये भात शेती करणार्‍या शेतकर्‍याचा मुलगा असणारे आणि सध्या अमेरिकन नागरिक असणारे पिटर तैसाई हे आहेत या मास्कचे शोधक. पिटर यांचा जन्म तैवानमधील क्वींगशुई जिल्ह्यातील तायचुंग येथे (१९५२)साली झाला. त्यांचे बालपण येथे असणार्‍या शेतातील घरातच गेले.

mr.beingmarathi.in

ायचुंग येथेच नॅशनल तैपाई विद्यापीठातून केमिकल फायबर इंजिनयरींगची पदवी त्यांनी संपादन केली. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्यांनी अमेरिका गाठली. अमेरिकेतील कान्स विधापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी घेतल्यावर त्यांनी प्रोफेसरची भूमिका स्विकारत टेनिसी विद्यापीठात शिकवण्यास सुरुवात केली.

mr.beingmarathi.in

अतिशय नम्र आणि विद्यार्थ्यांत लोकप्रिय असणारे तैसाई यांनी या मास्कची निर्मिती १९९२साली इलेक्ट्रोस्टॅटीक फिल्टरशेनने केली. सुरुवातीला औद्योगिक क्षेत्रात केमिकल नाकात,तोंडात जाऊ नये म्हणून हा मास्क वापरला जाऊ लागला परंतु कालांतराने याचा वापर सामान्यांनी सुरु केला.

mr.beingmarathi.in

सध्या हा मास्क सर्वांना उपयुक्त ठरत असून लोकप्रिय ठरला आहे.

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...