March 5, 2021
काय आहे लॅक रेषा

काय आहे लॅक रेषा आणि या रेषेवर भारत-चीनचे सैनिक का असतात निशस्त्र

भारत आणि चीन यांचे व्यापार संबंध प्राचीन काळापासून अस्तित्वात असून चीनचे सिल्क म्हणजेच रेशमी कापड भारतात प्रसिद्ध होते. चीन आणि भारतातील संबंधाचे लिखित पुरावे ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात आढळून येतात. भारतातूनच बौद्ध धर्म पूर्व आशियात पसरला. चीनमध्ये बौद्ध धर्म पहिल्या शतकात पसरला. भारत आणि चीनमधील व्यापार संबंध कालांतराने गहिरे होत गेले. सद्यस्थितीत चीनसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून चीनच्या वस्तूंनी भारतीय सणवारदेखील व्यापले आहेत.

mr.beingmarathi.in

19व्या शतकात चीनचा व्यापार ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीशी संबंधित होता. ब्रिटीशांनी दुसऱ्या महायुद्धात चीन आणि भारताचा वापर करून घेतला. या युद्धात सक्रीय असणाऱ्या जपानविरूद्ध लढताना ब्रिटीशांनी चीन आणि भारतात हॉल्ट छावण्या उभारल्या होत्या. 1950 नंतर स्वतंत्र भारत व चीन यांचे नवीन संबंध सुरू झाले. यातूनच दोन देशांमधील सीमवाद वाढीस लागले.

mr.beingmarathi.in

काय आहे लॅक रेषा ?
नुकतीच भारतीय आणि चीनच्या सैनीकात गलवान व्हॅलीजवळ झडप होऊन भारताचे सैनिक मारले गेले. दोन्ही देशांचे सैनिक निःशस्त्र असूनसुद्धा चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना लाकडी काठ्यांनी मारले. भारताने या झडपेबाबत स्वताची बाजू मांडताना नमूद केल की, गलवान व्हॅलीजवळ चीनी सैन्याचे टेंट दिसून आले. परिणामी भारताने तेथे सैन्य गस्त सुरू केली. या झडपेपूर्वी 9मे रोजी नाॅर्थ सिक्कीम नाकुला येथे दोन्ही सैन्यात झडप झाली तसेच चीनची हेलीकॉप्टर दिसून आली. परिणामी भारतीय सैन्याने पेट्रोलिंग सुरू केले.

mr.beingmarathi.in

गलवान व्हॅलीजवळच ‘लॅक रेषा ‘आहे. लॅक रेषा म्हणजेच The line Of actual control किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा होय. या रेषेमुळे भारत व चीन परस्परातील वेगळे होतात. या रेषेच्या अलिकडे भारताचा पूर्व लडाख तर पलिकडे चीनचा डेमचोक सेक्टर अक्साई यांचा समावेश होतो. भारताच्या दृष्टीने हे ठिकाण महत्वाच असून पाकिस्तान आणि चीन सीमा लडाखला येथे जोडलेल्या आहेत.

mr.beingmarathi.in

1958 मध्ये चीनने अकसाई येथे रस्ता बांधला, जो पुढे काराकुरमला जोडला गेला जो पाकिस्तानपर्यंत वाढत पोहचला. भारताच्या दाव्यानुसार चीनने अक्साई हडपल आहे. अक्साईतच गलवान व्हॅलीचा समावेश असून या व्हॅलीचा शोध काश्मीरमधील घोडे टोळी गलवानचा टोळी प्रमुख गुलाम रसूल गलवान याने 1899 मध्ये लावला. ज्यात नदीचा स्रोत गवसला व या व्हॅलीला गलवान नाव पडल. या सीमारेषेवर यापूर्वीही 1975 साली झडप होऊन भारताचे 4 सैनिक मारले गेले होते.

mr.beingmarathi.in

या रेषेवर दोन्ही देशांचे सैनिक का असतात निशस्त्र?
लॅक रेषेवर दोन्ही देशांचे सैनिक निःशस्त्र असतात जर घुसखोरी वाटली तर एकमेकांना हकलल जात. ज्याच प्रशिक्षण सैनिकांना दिलेल असत. 1993 साली भारताचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी चीनचा दौरा करत शांती समझोता मांडला, दोन्ही देशांनी त्याला आदर देत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार दोन्ही देशांतील सीमवाद आपसात मिटावा व सैन्यहानी टळावी या दृष्टीने काही अटी मान्य केल्या गेल्या ज्यात दोन्ही देशांनी लॅक सीमा रेषा मानावी व तिचा आदर करावा तसेच या रेषेवर गस्त घालताना दोन्ही देशाचे सैनिक निःशस्त्र राहतील असे मान्य करण्यात आले.

mr.beingmarathi.in

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...