March 5, 2021

कंडोम घेताना आणि वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट तर आहे अत्यंत महत्वाची

कंडोम घेताना आणि वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट तर आहे अत्यंत महत्वाची

निरोध अर्थात कंडोमचा वापर अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी तसेच लैंगिक आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी केला जातो हे सर्वश्रुत आहे. पातळ, लंबगोलाकार आकारात लिंगावर (शिश्नावर) उलगडत नेता येणारे रबरी आवरण म्हणजे कंडोम, असे सरळ भाषेत सांगता येईल. यामुळे संभोग झाल्यावर पुरुषाच्या लिंगातून स्खलीत होणारे वीर्य स्त्रीच्या योनीमार्गात न पडता ते या रबरी आवरणातच पडते. मात्र कंडोम घेताना आणि वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण याविषयी माहिती घेणार आहोत.

mr.beingmarathi.in

आकार : फार लहान आकाराचा कंडोम घेतल्यास संभोगामुळे होणाऱ्या घर्षणादरम्यान तो फाटू शकतो आणि योनीमार्गात वीर्यस्खलन होऊ शकते. त्यामुळे पुरुषाने स्वतःच्या लिंबाच्या आकारमानानुसार कंडोम खरेदी करावा. अलीकडे बाजारात मिळणारे जवळपास सर्वच कंडोम हे पुरेश्या मापात असल्यामुळे ही समस्या उध्दभवत नाही. तरीही काळजी घेतलेली बरी.

mr.beingmarathi.in

चिकनाई : कंडोमवर चिकनाई येण्यासाठी त्यावर विशिष्ट रसायनं लावलेले असते. जेणेकरून या तेलकटपणामुळे लिंगाची योनीमार्गात होणारी काढघाल सोपी होते. मात्र कंडोम फार जुना असल्यास त्यातील चिकनाई उडून जाते किंवा कमी होते आणि असा कंडोम वापरल्यास तो संभोगादरम्यान फाटू शकतो. त्यामुळे कंडोम खरेदी करताना त्याच्यावर त्याच्या समाप्तीची तारीख (एक्सपायरी डेट) जरूर पाहावी.

mr.beingmarathi.in

दोन कंडोम लावणे : अनेकजण एकावर एक दोन कंडोम लावतात. यामुळे जास्त सुरक्षा मिळून कंडोम फाटणार नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र एकावर एक दोन कंडोम लावल्यास मोठ्या प्रमाणावर घर्षण होते आणि कंडोम फाटण्याची शक्यता दुप्पट होते. त्यामुळे एकावेळी लिंगावर एकाच कंडोम लावणे योग्य आहे,

mr.beingmarathi.in

इतर काळजी : एकदा वापरलेला कंडोम पुन्हा वापरू नये. तसेच वापरलेल्या कंडोमची गाठ मारून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. नवीन कंडोमची पाकिटं थंड आणि कोरड्या तसेच सावलीच्या ठिकणी ठेवावीत. कंडोमचे पाकिटं फोडताना अणकुचीदार वस्तूंचा वापर करू नये.

mr.beingmarathi.in

(Disclaimer : ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या वरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती हि प्राथमिक स्वरूपाची असून ती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय होऊ शकत नाही. यातील कोणताही उपचार किंवा सल्ला अमलात आणण्यापूर्वी सदरील विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...