सलमान खानचा वीरगती हा चित्रपट तुम्ही पहिला असेल. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा दडवाल या अभिनेत्रीने अभिनय केला होता. उत्तम सौंदर्य आणि अभिनय यामुळे तिने त्यावेळी चाहत्यांची मनं जिंकली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून ति कला विश्वापासून खूप लांब आहे. मध्यंतरी तिला क्षयरोग आणि फुफ्फुसांचा आजार झाल्यामुळे ती चर्चेत आली होती. आणि पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या चर्चा रंगू लागल्याआहे त्या चर्चा तिच्या सध्याच्या परिस्थितीवरील आहे.
बॉलीवूड कलाकार त्यांच्या लाईफ स्टाईलमुळे जास्त चर्चेत असतात. आलिशान घर महागड्या गाड्या महागडे राहणीमान यामुळे नेहमी त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा असते. पण या सगळ्या गोष्टींपासून पूजा दडवाल खुप लांब आहे. विशेष म्हणजे तिची सद्याची परिस्थिती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
कधीकाळी सलमान खान सोबत वीरगती चित्रपटात स्क्रीन चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली अभिनेत्री पूजा दडवाल प्रचंड हलाखीचे जीवन जगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती सध्या वर्सोवा मधील एका चाळीत राहत असून, त्याच चाळीतील एका कुटुंबाने तिला आश्रय दिला आहे. ती ज्या घरात राहते त्या घरातील धुनी-भांडी तिलाच करावी लागतात. तसेच घरातील छोटे-मोठे कामे देखील देखील तीच करते. असे समजून घ्या की ती ती आता एक मोलकरीण म्हणून आपले जीवन जगत आहे.