March 5, 2021
प्रार्थना बेहेरेने सांगितल सुशांतच आयुष्यातील स्थान

अंकिता लोखंडे का आहे सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर चर्चेत ? प्रार्थना बेहेरेने सांगितल सुशांतच आयुष्यातील स्थान

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंगच्या सुसाईड करण्यान त्याच्या फॅन्ससह सर्व हिंदी फिल्म इंडस्ट्री शॉकमध्ये आहे. सुशांतने मागे कोणतीही सुसाईड नोट सोडल्याचे निदर्शनास आलेल नाही परंतु सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनशी लढत असल्याची माहिती समोर येत असून त्यासाठी तो ट्रीटमेंट घेत असल्याचे सिद्ध होत आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी सोशल मिडीयावर पसरताच बरेचजणांनी पवित्र रिश्ताच्या टीम आणि सुशांतची एक्स गर्ल फ्रेंड अंकिता लोखंडे यांना स्क्रोल करायला सुरुवात केली. अंकिता या न्यूजवर कोणतीही प्रतिक्रिया देण शक्य नव्हतं, याच कारण म्हणजे तिला झालेल दुख अतिशय तिव्र आहे. दरम्यान पवित्र रिश्ता याच मालिकेतील तिची को स्टार प्रार्थना बेहेरे जीने या मालिकेत अंकिताच्या बहिणीची भूमिका निभावली होती, तिने अंकिताची मनोव्यथा व्यक्त केली. सुशातच्या सुसाईडची बातमी ऐकताच अंकिता धाय मोकलून रडत असून तीच दुख अतिव आहे.

mr.beingmarathi.in

एका इंटरव्ह्यू दरम्यान प्रार्थनेने सांगितल की, “पवित्र रिश्ताच्या वॉट्स अप ग्रुपवर सुशांतचा दुखद मेसेज फ्लॅश झाला परंतु मी तो खुप उशिरा वाचला. मेसेज वाचून अतिशय धक्का बसला व काय झाल हे कळायला उशीर लागला. हे अविश्वसनीय होत. मी लगेचच अंकिताला फोन केला. ती सतत रडत होती. काही क्षण मला सुचेनाच कुणाला फोन करावा? त्यानंतर मी महेश शेट्टींना फोन केला. तेही फोनवर सतत रडत होते आणि ते सुशांतच्या अंतिम दर्शनासाठी चालले होते. त्यांना मी बरोबर येण्याविषयी विचारल आणि म्हटल, काहिही झाल तरी तो आपला मित्र आहे यार”. पुढे ती म्हणाली, मी अंकिताच्या शोकाविषयी सांगू शकते.

mr.beingmarathi.in

ती तिव्र रडत असून त्यातून बाहेर येऊ शकत नाही. परंतु प्रत्येकाने हे समजून घ्याव लागत की, आयुष्यात पुढे जावच लागत. तिच्या आयुष्यात सध्या कोणी तरी असून त्या नात्याचा आदर करण तिच्यासाठी गरजेच ठरत. अंकिता अत्यंत सेन्सिटीव्ह आणि इमोशनल आहे. जेव्हा मी पवित्र रिश्ताच्या ग्रुपवर आपण जाऊन सुशांतच अंतिम दर्शन घेऊ असा मेसेज टाकला तेव्हा सर्वच जण भावूक झाले. परंतु आम्हाला अस कळल की, या विधीला केवळ 20 लोकच उपस्थित राहू शकतील. कोरोना स्थितीमुळ हा नियम पाळण गरजेच होत.

mr.beingmarathi.in

प्रार्थनान व्यक्त केल की, ती सुशांतच्या अगदी जवळ होती. सुशांतन पवित्र रिश्ता सोडताच त्यांचातला कॉंटक्ट संपुष्टात आला. तिने हेही सांगितल की, सुशांतशी तिचा संपर्क पूर्णपणे संपला होता. परिणामी दोघात आॅकवर्डनेस आला होता. सुशांतला त्याची स्पेस गरजेची वाटत होती त्यामुळे मी त्याला सांगितल, मी तुझी मानसिक विचारसरणी समजू शकते तु तुझी स्पेस ठेवू शकतोस तसच जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा हाक मार मी नक्कीच तिथे असेन. कालांतराने सुशांत हिंदी फिल्म इंडस्ट्रीत स्थिरावू लागला. त्याच फ्रेंड सर्कल आणि लाईफ स्टाईल यात बदल झाला. बड्या बॅनरसोबत तो काम करू लागला आणि आमच्यातला संपर्क तुटला.

mr.beingmarathi.in

प्रार्थनान सुशांतच स्थान वर्णन करताना तो माझ्यासाठी इन्स्पिरेशन होता आणि त्याच्यासारख व्हायची आपली इच्छा होती अस सांगितल. सुशांत आणि प्रार्थनाच्या करिअरला एकत्रच सुरुवात झाली होती. सुशांत नेहमीच प्रार्थनाच्या कामाची तारीफ करत असे. दुखद आहे पण प्रार्थना यापुढे तिच्या भावना व्यक्त करू शकली नाही.

mr.beingmarathi.in

सुशांत आणि अंकिताची मैत्री पवित्र रिश्ताच्या सेटवर जमली आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. त्यांची आॅनस्क्रीन, आॅफस्क्रीन केमिस्ट्री पसंत केली गेली. चाहत्यांना या दोघांनी लग्न कराव अस वाटत होत. परंतु दोघेही वेगळे झाले. याच कारण सुशांतचा बिझिनेस आणि अंकिताचा पजेसिवपणा कारणीभूत ठरल्याच बोलले जाते. सहा वर्ष लिव इन रिलेशनशीपमध्ये एकत्र राहिल्यावर 2016 साली दोघांनी वेगळ्या वाटा निवडल्या. याविषयी सुशांतन एक ट्विट केल होत, ” ती अल्कोहोलिक झालेली नाही आणि मी वुमनायजर झालेलो नाही.” या ट्विट नंतर दोघांच्या नात्याबद्दलच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.

mr.beingmarathi.in

सुशांतचा अंत्यविधी त्याचे वडील के के सिंग यांनी मुखाग्नी देऊन केला. यावेळी त्याचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती. रेहा चक्रवर्ती, क्रिती सेनन, श्रद्धा कपूर, राजकुमार राव, रणदिप हुडा इत्यादींचा समावेश होता.

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...